LIVE: पुण्यात वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे 11 झाडांची पडझड; मुंबईतही रिमझिम सुरू

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 16, 2021, 00:50 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  0:27 (IST)

  पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात

  पाहा latest सॅटेलाइट इमेज

  0:25 (IST)

  पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, झाडं पडली

  अग्निशमन दलाकडे रात्री 9 ते 11 दरम्यान झाड पडझडीच्या 11 घटनांची नोंद झाली. जखमी कोणी नसून शहरात येरवडा, कोंढवा, कोथरुड, हडपसर, मुकुंदनगर, कल्याणीनगर, धनकवडी, काञज, कसबा पेठ याठिकाणी झाडपडी झाली. अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी जवानांना सतर्कतेचा आदेश.

  0:22 (IST)

  cyclone tauktae  भांडूप ते कोथरूड.. पुण्या मुंबईत सुरू झाला वादळाचा इफेक्ट

  पुण्यात वाऱ्यासह सरींना सुरुवात, रात्री 9 नंतर वारा वाढला.

  पुण्यात वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे 11 झाडांची पडझड

  मुंबई उपनगरात पावसाला सुरुवात

  15:43 (IST)

  जळगाव - सहकारी औद्योगिक वसाहतीमधील घटना
  केमिकल टाकी साफ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू
  गुदमरून मृत्यू झालेले कामगार केमिकल फॅक्टरीतील

  हिंगोली - औंढा नागनाथ पोलीस ठाण्यावर दगडफेक
  मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपींना अटकेची मागणी
  पोलीस आणि जमावातील वादानंतर केली दगडफेक
  जमावाच्या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी
  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
  औंढा नागनाथ पोलिसांनी 11 आरोपींना घेतलं ताब्यात 

  13:26 (IST)

  देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र
  महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची दिली माहिती
  केंद्राकडून राज्याला सर्वाधिक मदत - फडणवीस 

  12:12 (IST)

  'चक्रीवादळाशी तोंड द्यायला मनपा सज्ज'
  मुंबई मनपाची यंत्रणा सज्ज - महापौर
  एनडीआरएफ टीम तैनात - महापौर
  'तज्ज्ञांच्या मतानुसार मुंबईला धोका नाही'
  'शहरात पाणी घुसणाऱ्या ठिकाणी पंप'
  6 चौपाट्यांवर विशेष पथकं - महापौर
  'आपत्कालीन यंत्रणा चौपाट्यांवर तैनात'
  सी लिंक पूर्णत: बंद केलाय - महापौर
  'म्युकरमायकोसिस रुग्णांनी घाबरू नये'
  'मनपाकडे म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन'
  मुंबई मनपा इंजेक्शन मोफत देणार - महापौर

  12:12 (IST)

  'एनडीआरएफची एक टीम गोव्यात'
  मुंबईत एनडीआरएफच्या 3 टीम तैनात
  'पुण्यात NDRFच्या 15 टीम सज्ज'
  'राज्याला चक्रीवादळाचा फटका नाही'
  'किनाऱ्यापासून 250 किमीवरून वादळ जाणार'
  एनडीआरएफ कमांडन्ट यांची माहिती

  10:19 (IST)

  'तोत्के' चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं
  सुमारे 7 किमी प्रतितास वेगाने सरकलं
  चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता
  चक्रीवादळ 18 मे रोजी गुजरात किनारपट्टीवर

  10:3 (IST)

  एनडीआरएफची टीम गोव्याच्या दिशेनं
  राज्यातील समुद्रकिनारी टीम तैनात नाही
  राज्यात नुकसान होणार नसल्याचा अंदाज

  9:55 (IST)


  'तोत्के' चक्रीवादळाचा केरळमध्ये कहर
  केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी
  कोझिकोडे, कुन्नूर, वायनाडमध्ये पाऊस
  वलपारी, पुनालूर, कोचीमध्ये पूरस्थिती​

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स