मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Tauktae update पुढील तीन तासांत आणखी तीव्र होणार चक्रीवादळ, आज वाऱ्यांचा वेग ताशी 115 किमीपर्यंत पोहोचणार

Tauktae update पुढील तीन तासांत आणखी तीव्र होणार चक्रीवादळ, आज वाऱ्यांचा वेग ताशी 115 किमीपर्यंत पोहोचणार

cyclone tauktae update आगामी 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरुप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या हे चक्रीवादळ गोव्यापासून 290 किलोमीटर, मुंबईपासून 650 किलोमीटर तर गुजरातपासून 880 किलोमीटर अंतरावर आहे.

मुंबई, 15 मे : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळं निर्माण झालेलं तौत्के हे चक्रीवादळ (Cyclone Tauktae in Arabian sea) पुढच्या तीन तासांमध्ये अधिक तीव्र स्वरुप धारण करणार आहे. सध्या मुंबईपासून हे चक्रीवादळ 650 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र याचा वेग वाढणार असून. आज ताशी 115 किलोमीटर एवढ्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवमान विभागानं व्यक्क केली आहे. तौत्के चक्रीवादळ हे सध्या मुंबई, गोव्याच्या दिशेने येत आहे. सध्या ताशी 13 किलोमीटर एवढा चक्रीवादळाचा वेग असून ते उत्तरेच्या दिशेने पुढं सरकत आहे. पण हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढच्या तीन तासांमध्ये चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्यामुळं त्याचा वेग वाढण्याची शक्यता देखिल व्यक्त करण्यात येत आहे. तसंच आगामी 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरुप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या हे चक्रीवादळ गोव्यापासून 290 किलोमीटर, मुंबईपासून 650 किलोमीटर तर गुजरातपासून 880 किलोमीटर अंतरावर आहे. (वाचा-LIVE PHOTOS: राज्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका; 'तौत्के' वादळ कोणत्या दिशेनं पुढं सरकणार?) या चक्रीवादळाचा परिणाम पाहता आज सुमार ताशी 80 ते 115 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्या याची तीव्रता वाढणार असून ताशी 115 ते 145 किमी एवढा वाऱ्याचा वेग असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण ते गोवा या पट्ट्यात मुसळधार ते अतिमूसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या परिसरात राहणाऱ्या लोकांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हे वादळ राज्यात मुंबईसह दक्षिण कोकण किनारपट्टीत धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरातलाही याचा मोठा फटका बसू शकतो. (वाचा-Cyclone Tauktae : चक्रीवादळ सध्या आहे कुठे? पाहा LIVE cyclone tracking) लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हे वादळ लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, गोव्यापासून पुढे सरकत आहे.
First published:

Tags: Cyclone, Goa, Gujrat, Mumbai

पुढील बातम्या