Home /News /maharashtra /

Alert: मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा; पुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार

Alert: मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा; पुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार

पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

    मुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये (Cyclone Taukae Mumbai Updates) सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात दुपारी 11 वाजल्यापासून तुफान पावसालाही सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (IMD)ने नवा (Revised alert by IMD Mumbai)इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असलं, तरी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका देत ते पुढे सरकत आहे. पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. सखल भागात पाणी मुंबईच्या परळ भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तसंच अंधेरी सब वेसुद्धा पाण्याखाली गेल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाण्यात झाडं पडल्याच्या 30 घटना ठाण्यातही दुपारपासून वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढला आहे. महापालिकेच्या हद्दीत 13 मोठी झाडे पडली. अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. 15 झाडांच्या मोठ्या चक्रीवादळाच्‍या प्रभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. वादळाचा ट्रॉम्बे जेट्टीलाही तडाखा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, मोठ्या लाटा यामुळे ट्रॉम्बे जेट्टीत नांगरलेल्या बोटींचं मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी रात्रीच धडकणार वादळ हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्याचं रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झालं असून रात्री 8 नंतर ते गुजरात किनारपट्टीच्या जवळ पोहोचेल. रात्री 11 च्या सुमारास किनारपट्टीला धडकण्याचा (Landfall)अंदाज वर्तवण्यात आला आहे.
    First published:

    पुढील बातम्या