मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Cyclone tauktae Effect: 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी केले रात्रंदिवस काम

Cyclone tauktae Effect: 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी केले रात्रंदिवस काम

Cyclone tauktae effect on power supply महावितरणचे अधिकारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

Cyclone tauktae effect on power supply महावितरणचे अधिकारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

Cyclone tauktae effect on power supply महावितरणचे अधिकारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

मुंबई, 18 मे: तौक्ते चक्रीवादळामुळं (Cyclone tauktae) बसलेल्या पावसाच्या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. राज्यात 10752 गावांतील वीज यंत्रणांच (Electricity) नुकसान झाल. त्यामुळं खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत (Electricity Supply) करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 6040 गावातील वीजपुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे.

(वाचा-मुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट)

राज्यात जवळपास साडेपाच हजार विजेचे खांब पडले, तारा तुटल्या आणि जोरदार वारा व मुसळाधार पावसाने फिडर ट्रिप झाले. मात्र अंधाऱ्या रात्री कशाचीही तमा न बाळगता व रात्रभर जागून महावितरण कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा दिली. तसंच आताही महावितरणचे अधिकारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

(वाचा-लॉकडाऊनमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; छापेमारीत धक्कादायक कारण आलं समोर)

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आदींसाठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे 622 रोहित्रे, सुमारे 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करून दिलेले आहेत.

राज्यातील नुकसान आणि महावितरणचे काम  

- महावितरण कंपनीच्या 13 हजार तंत्रज्ञांची फळी मैदानात

- स्वतःचे 9 हजारहुन अधिक तर कंत्राटी 4 हजारहून अधिक कर्मचारी

- 200 हुन अधिक लहान मोठे ट्रक, 50 क्रेन व जेसीबी मशीन कार्यरत

- 1546 उच्चदाब पोल पडले व क्षतीग्रस्त - 425 पूर्ववत व दुरुस्त केले.

- 3940 लघुदाब पोल पडले व क्षतीग्रस्त - 974 पूर्ववत व दुरुस्त केले.

- 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड - 68 हजार 426 दुरुस्त

- 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

जिल्हावार असे आहेत आकडे

* ठाणे - 7 लाख 85 हजार 519  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

* रायगड - 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

* पालघर - 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

* रत्नागिरी - 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत * सिंधुदुर्ग - 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

* नाशिक - 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

* कोल्हापूर - 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा  पूर्ववत

* सातारा - 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत - 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

* पुणे - 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

* सांगली - 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित  - 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

* विदर्भ - 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित -  50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

* मराठवाडा - 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

(मंगळवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी)cc

First published:

Tags: Cyclone, Electricity, Maharashtra, Maharashtra News, Mumbai