Home /News /maharashtra /

कर्तव्यनिष्ठेला सलाम! चक्रीवादळानंतर अवघ्या काही तासांतच 479 गावांचा वीज पुरवठा सुरळीत

कर्तव्यनिष्ठेला सलाम! चक्रीवादळानंतर अवघ्या काही तासांतच 479 गावांचा वीज पुरवठा सुरळीत

MAHAVITARAN restore power supply in Konkan: चक्रीवादळामुळे कोकणातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.

    रत्नागिरी, 17 मे: तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कोकणाला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत (Power Supply restore) करण्यासाठी महावितरणच्या (MAHAVITARAN) कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आणि अवघ्या काही तासांतच निम्म्याहून अधिक गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. चक्रीवादळानंतर अवघ्या काही तासांत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्याला सलाम. चक्रीवादळाने मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातील 3665 गावांमधील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला. मात्र अतितीव्र स्वरुप धारण केलेल्या या चक्रीवादळाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठी वीजयंत्रणा जमीनदोस्त केली आहे. चक्रीवादळ बाधीत उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीचे अविश्रांत कामे करीत आहेत. Cyclone Tauktae: खवळलेल्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी; देवदूत बनत नौदल आलं धावून; आतापर्यंत 38 जणांची सुटका अवघ्या अर्धा ते दोन तासांत वीज पुरवठा सुरळीत चक्रीवादळामुळे महावितरणच्या 138 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. तर 706 पैकी 439 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने सुरू करण्यात येत आहे. यामध्ये चार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांसह 210 पैकी 173 कोविड सेंटर्स आणि लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा अवघ्या अर्धा ते दोन तासांमध्ये पूर्ववत करण्यात आला. उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. चक्रीवादळामुळे वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. याकरिता मुंबई मुख्यालयस्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तीन मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या भागातील अधिकाऱ्यांसोबत वीजपुरवठ्याबाबत ते समन्वय साधत आहेत. तसेच मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्यांना सिंधदुर्ग येथील वीजयंत्रणेच्या कामाची निकड लक्षात घेऊन समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cyclone, Ratnagiri, Sindhudurg

    पुढील बातम्या