रायगड, 17 मे : तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae ) हे रायगड (Raigad) जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाले आहे. पहाटे तीन वाजल्यापासूनच जिल्ह्यात या वादळाचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, या वादळाचा तडाखा जिल्ह्याला फारसा जाणवला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7,866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. तसेच जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे.
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158 या ठिकाणातील एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
तर साताऱ्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. विजेचे खांब आणि तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
Cyclone Tauktae : मुंबईजवळ पोहोचले चक्रीवादळ, पाहा हा LIVE VIDEO
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळामुळे उद्या म्हणजेच 17 मे 2021 रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड (Red Alert for Raigad) अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे.
ऑक्सिजन तुटवड्याचं संकट होणार कमी; DRDO आज लॉन्च करणार 2-डीजी अँटी कोविड औषधतौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गस्त घातली जात आहे. दादरच्या किनारपट्टीवर महापालिकेने लाईफ गार्ड तैनात केले असून सात जणांची टीम कुणालाही समुद्रात जाण्यापासून मज्जाव करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.