मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Cyclone Tauktae: वादळाचा कोकणाला तडाखा; कुठे झाडांची पडझड तर कुठे बत्ती गुल; अनेक गावांचा संपर्क तुटला

Cyclone Tauktae: वादळाचा कोकणाला तडाखा; कुठे झाडांची पडझड तर कुठे बत्ती गुल; अनेक गावांचा संपर्क तुटला

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकणाला मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून येत आहे.

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकणाला मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून येत आहे.

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकणाला मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग, 16 मे: तौत्के चक्रीवादळा (Cyclone Tauktae)मुळे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येत आहे. तौत्के चक्रीवादळ गोव्याकडून आता कोकण किनारपट्टीच्या शेजारून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार वारे (strong winds) वाहत आहेत. तसेच मुसळधार पाऊसही (Heavy Rain) पडत आहे.

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. तसेच आंब्याचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. एकूणच सिंधुदुर्गातील अनेक गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती समोर आली आहे.

सावंतवाडी ते वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अनेक झाडं चक्रीवादळाने उन्मळून पडली आहेत. इलेक्ट्रिक पोलही अनेक ठिकाणी पडले आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांवरील सर्व अडथळे दूर करण्याचं काम सुरू केलं आहे.

वाचा: Cyclone Tauktae: काळजी घ्या! उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

गोव्यातील पणजी कारवार कोचीन महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळला. हा वृक्ष कोसळल्याने महमार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चक्रीवादळामुळे वृक्ष कोसळला. त्यानंतर तात्काळ NDRF कडून मार्ग मोकळा करण्यास सुरूवात करण्यात आली. चक्रीवादळामुळे गोव्यातील शेतकरी अडचणीत, आंबा उत्पादकांसह ऊस उत्पादकांना फटका, रसवंतीगृह साठी लावन केलेला ऊस भुईसपाट झाले आहे.

वाचा: Cyclone Tauktae: चक्रीवादळाच्या संकटाचं सरकारला गांभीर्य नाही का? कोकणात NDRFची एकही टीम नाही

रत्नागिरीत वाऱ्याचा वेग वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला असून जिल्ह्यामध्ये अतिवेगाने वारे वाहू लागले आहेत. तसेच जिल्ह्यातल्या समुद्र जवळ चक्रीवादळ येऊन धडकण्याच्या मार्गावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळ झाल्यानंतर त्याचे परिणाम बाजूच्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याच्या मार्गावर असून त्याचे पडसाद जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहेत. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती अति वेगाचा वारा जोरदार अतिवृष्टी ही सर्व परिस्थिती धोकादायक बनू पाहत आहे.

दुपारी साधारण 12 च्या सुमारास सदर वादळाच्या रत्नागिरी जिल्हयात प्रवेश केल्याच्या स्थितीनंतर वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठया प्रमाणावर  झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटुन विद्युत पुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार रत्नागिरी व राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तथापि जिवीत हानीचे वृत्त नाही.

वाचा: Tauktae वादळादरम्यान व्हायरल होणारा हा PHOTO आजचाच आहे का?

रायगडमध्ये काय स्थिती?

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वाढत्या वाऱ्यामुळे लाटा उसळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्र खवळलेल्या अवस्थेत आहे. दरम्यान जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या उर्वरीत 96 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. समुद्रकिनारी ६२ आणि खाडी किनाऱ्यालगतच्या 128 गावांना सतर्कतेचा तसेच संभाव्य बाधित कुटुंबांना स्थलांतराचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही नुकसान होणार नाही. तरी देखील महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षी अलिबागला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता त्यामुळे येणारा वादळ काय करेल या भितीने नागरिक घाबरून गेले आहेत.

First published:

Tags: Cyclone, Sindhudurg