अलिबाग, 22 मे: तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) मोठा फटका कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बसला आहे. या जिल्ह्यांत मोठी वित्तहानी झाली असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याच दरम्यान आता रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर मृतदेह आढळून येऊ लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांत तब्बल 5 मृतदेह आढळून (5 dead bodies found on Raigad beach) आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांत 5 मृतदेह आढळले
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत समुद्र किनाऱ्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 मृतदेह आढळून आले आहेत तर शुक्रवारी रात्री एक मृतदेह आढळून आला. मुरुड, नवगाव, आवास आणि दिघोडी या समुद्र किनाऱ्यांवर आज चार मृतदेह आढळून आले आहेत. हे पाचही मृतदेह पुरुषांचे आहेत.
उद्धव ठाकरेंनी 8 दिवस कोकणात जाऊन राहावं, अजित दादांनी त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत बोटीतील बेपत्ता असलेल्यांचे मृतदेह असण्याची शक्यता
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले हे मृतदेह पुरुषांचे असून तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या बोटीतील हे मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तौत्के चक्रीवादळाचा रायगडला फटका
तौत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. राजगड जिल्ह्यातील जवळपास 6 हजार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या दरम्यान घराची भिंत, सिमेंटचे ठोकले, झाड अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले. यासोबतच 2 जनावरांचाही मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.