• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Cyclone Tauktae: वादळात 3 खलाशी बेपत्ता; सिंधुदुर्गात 447 घरांचे नुकसान तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Cyclone Tauktae: वादळात 3 खलाशी बेपत्ता; सिंधुदुर्गात 447 घरांचे नुकसान तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Fishermen missing in storm: कोकणातल चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असतानाच आता 3 खलाशी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
सिंधुदुर्ग, 16 मे: तौत्के चक्रीवादळा (Cyclone Tauktae)मुळे सिंधुदुर्गात (Sindhudurg) आज मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy rainfall with strong winds) झाला. याच दरम्यान आता 3 खलाशी बेपत्ता (3 sailor missing) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खलाशांच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तटरक्षक दलाचीही मदत घेतली असून या खलाशांचा शोध सुरू आहे. तीन खलाशी बेपत्ता मिळालेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळामुळे समुद्राला मोठे उधाण आले होते, उंचच उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकत होत्या. चक्रीवादळामुळे देवगड बंदरात नांगरलेल्या बोटीचा नांगर तुटला त्यामुळे बोटीवरील तीन खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन विभागाला मिळाली. नांगर तुटलेल्या बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी इतर 4 खलाशांनी प्रयत्न केला. मात्र, उधाणलेल्या समुद्रामुळे हे तिन्ही खलाशी बेपत्ता झाले. Cyclone Tauktae: वादळाचा कोकणाला तडाखा; कुठे झाडांची पडझड तर कुठे बत्ती गुल; अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक गावांचा संपर्क तुटला चक्रीवादळामुळे आलेला सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे सिंधुदुर्गातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. तसेच आंब्याचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. एकूणच सिंधुदुर्गातील अनेक गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती समोर आली आहे. सावंतवाडी ते वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अनेक झाडं चक्रीवादळाने उन्मळून पडली आहेत. इलेक्ट्रिक पोलही अनेक ठिकाणी पडले आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांवरील सर्व अडथळे दूर करण्याचं काम सुरू केलं आहे. Cyclone Tauktae: काळजी घ्या! उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट 447 घरांचे नुकसान तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच 37 गोठ्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. 3 शाळांचे नुकसान झाले आहे. तसेच 23 विजेचे खांबही पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. 6500 नागरिकांचे स्थलांतर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर कऱण्यात आले आहे. रत्नागिरीतील 3896 नागरिकांचे, सिंधुदुर्गातील 144 तर रायगडातील 2500 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published: