पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू 'रायगड', तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर

पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू 'रायगड', तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर

हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार

  • Share this:

मुंबई, 5 जून: दोन दिवसांपूर्वी आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसली. राजगड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. वादळामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी केली. रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यानी जाहीर केली आहे.

हेही वाचा.. कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी मुंबईहून मांडवा अलिबाग येथे आगमन झालं. त्यांच्यासमवेत मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, या चक्रीवादळात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून येणार नाही. शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये, यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.  तातडीने 100 कोटी रुपये रायगड जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आले आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण व्हायला वेळ लागेल.  पंचनामे पूर्ण झाल्यावर आणखी आर्थिक मदत देता येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी त्याच दिवशी बोलणं झालं. मदत संदर्भात संपूर्ण आढावा घेतल्यावर बोलता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आणि करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या थळ गावातील नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे.

हेही वाचा... कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ठळक मुद्दे

# चक्रीवादळात 6 जणांचा मृत्यू झाला

# पंचनामे पूर्ण व्हायला वेळ लागेल पण तातडीने 100 कोटी रुपये रायगड जिल्ह्यासाठी देतोय.

# पंचनामे पूर्ण झाल्यावर आणखी आर्थिक मदत देता येईल.

# आपत्ती काळात जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली,

# हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार .

# कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे,

# प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल,

# आज मी आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे,

# संकट सर्वांसाठी असते,पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.

# घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार.

# मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्द्ल शासन मदत देणार.

First published: June 5, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या