Axis Bankची यंत्रणा हॅक करून 2 कोटी 6 लाखांची रक्कम लंपास

Axis Bankची यंत्रणा हॅक करून 2 कोटी 6 लाखांची रक्कम लंपास

लॉकडाऊनच्या काळात राज्यात आणि देशात सायबर क्राईमचे गुन्हे खूप मोठ्या प्रमाणावर घडले होते. मात्र थेट बँकेचीच संगणक यंत्रणा हॅक करून पैसे लंपास करणं ही मोठी घटना समजली जाते.

  • Share this:

धुळे 10 जून: धुळे शहरातील Axis Bankची यंत्रणा हॅक करून धुळे विकास बँकेने ठेवलेले सुमारे दोन कोटी रुपये सहा लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. बँकेची यंत्रणा हॅक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लांबविण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. ही रक्कम काही वेळातच देशातील वेग वेगळ्या 27 बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे सकाळी सात ते साडेदहा वाजताच्यादरम्यान यंत्रणा हॅक करून ही रक्कम लांबविण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात ठगसेनांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात आणि देशात सायबर क्राईमचे गुन्हे खूप मोठ्या प्रमाणावर घडले होते. मात्र थेट बँकेचीच संगणक यंत्रणा हॅक करून पैसे लंपास करणं ही मोठी घटना समजली जाते.

हे वाचा -

काँग्रेस नगरसेवकाने दिली मुलाच्या लग्नाची पार्टी, स्वयंपाकीच निघाला पॉझिटिव्ह

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग झाला लाल; अचानक कसा बदलला रंग?

अमेरिकेची ही रायफल शत्रूचा उडवेल थरकाप, लक्ष्य भेदण्याची खात्री झाल्यावरच गोळी

First published: June 10, 2020, 11:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading