Home /News /maharashtra /

Online Fraud: RBI अधिकारी असल्याचं सांगत घातला 70 लाखांचा गंडा

Online Fraud: RBI अधिकारी असल्याचं सांगत घातला 70 लाखांचा गंडा

हर्बल प्रॉडक्ट्सच्या खरेदीच्या बहाण्याने नगरच्या (Ahmednagar) एका व्यक्तीला परदेशी नागरिकाने तब्बल 70 लाखाचा चुना लावला आहे.

  अहमदनगर, 23 डिसेंबर: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social media) भारतीय नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीची (Fraud) प्रकरणं वाढत चालली आहे. अलिकडेच दिल्लीत (Delhi) राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना गंडा घालणाऱ्या युगांडाच्या (Uganda) एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजं असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या फसवणुकीचं दुसरं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी नायजेरियन (Nigeria) असून त्यानं नगरच्या (Ahmednagar) एका व्यक्तीला तब्बल 70 लाखाचा चुना लावला आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरण समोर आलं असून नगरच्या पोलिसांनी दिल्लीला जावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून आणि विश्वास संपादन करून नगरमधील एका उच्चशिक्षित व्यक्तीला 70 लाखांना गंडा घातला आहे. त्यानं हर्बल प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने फसवलं असून आरोपी नायजेरीयन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचं भासवून बनावट इमेल आणि कागदपत्रांचा वापर करून फिर्यादी व्यक्तीची फसवणूक केली आहे. नगरच्या पोलीस पथकानं दिल्लीत जाऊन या आरोपी ठगाच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित फसवणुकीचं प्रकरण सप्टेंबर महिन्यात घडलं होतं. फसवणूक झालेल्या व्यक्तीनं नगरच्या सायबर शाखेकडे तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. अटक केलेल्या आरोपीचं नाव अमेलिया स्मिथ असं आहे. त्यानं भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने विविध कारणांसाठी फिर्यादीकडून 70 लाख 87 हजार रुपये उकळले. त्यासाठी त्याने आरबीआयच्या नावाने आणि सरकारी कार्यालयांचे बनावट ईमेल वापरून फिर्यादीची फसवणूक केली आहे. मोबाईल नंबर आणि बॅंक खात्याच्या अधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आहे. संशयित आरोपी दिल्लीत राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नगर पोलिसांनी आठ दिवस दिल्लीत राहून आरोपीला पकडलं आहे. हा आरोपी सतत आपलं राहण्याचं ठिकाण बदलत होता. या नाव आरोपीचं नाव इदू केस्टर उर्फ इब्राहिम तो मूळचा नायजेरिया या देशाचा नागरिक आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयाने 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ahmednagar, Crime, Cyber crime

  पुढील बातम्या