• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • लग्नाच्या वाढदिवसाला बायकोच्या हातात तलवार देऊन कापला केक, नवऱ्याला झाली जेल, VIDEO

लग्नाच्या वाढदिवसाला बायकोच्या हातात तलवार देऊन कापला केक, नवऱ्याला झाली जेल, VIDEO

नांदेडहुन त्याने तलवार आणून घरी ठेवली होती. पण, तलवार बाळगणे हेच या तरुणाला चांगलेच महागात पडले.

  • Share this:
औरंगाबाद, 03 मे: लग्नाचा वाढदिवस म्हटलं पती आपल्या पत्नीसाठी काय करेल याचा नेम नाही. औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क 'मुळशी पॅटर्न' स्टाईल तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आला. हा व्हिडीओ हौशीने सर्वत्र शेअर केला. पण, याची दखल पोलिसांनी घेतली आणि पतीला जेलची हवा खावी लागली. घडलेली हकीकत अशी की,  ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी केक मागवला होता. त्यानंतर पत्नीच्या हातात तलवार देऊन दोघांनी दिमाखात केक कापला. मात्र त्याचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, आणि पोलिसांनाही मिळाला. त्यानुसार, पोलिसांनी या इसमाला शोधत घर गाठले. विश्रांतीनगरमध्ये हा तरुण राहतो. पोलिसांनी घराची झडती घेतली असता पलंगाखाली तलवार लपून ठेवली होती. पोलिसांनी तलवार जप्त केली आणि याला अटक केली.

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव! आजची मॅच रद्द होणार?

महत्वाचं म्हणजे, हा इसम कुठलाही गुन्हेगार नाही. तर नोकरी करणारा एक युवक आहे, नांदेडहुन त्यानं तलवार आणून घरी ठेवली होती. पण, तलवार बाळगणे हेच तरुणाला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: