मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पोलिसांच्या विनंतीनंतरही किरीट सोमय्या अमरावतीत जाण्यावर ठाम, कारवाई होणार?

पोलिसांच्या विनंतीनंतरही किरीट सोमय्या अमरावतीत जाण्यावर ठाम, कारवाई होणार?

 अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

अमरावती, 16 नोव्हेंबर : त्रिपुरातील कथित हिंसाचारामुळे (tirura violence ) अमरावतीत रझा अकादमीने बंद पुकारला होता. त्यानंतर भाजपने बंद पुकारले असता हिंसक वळण (amravati violence) मिळाले. शहरात शांतता असून संचारबंदी लागू आहे.  अशा परिस्थितीत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) अमरावतीत जाण्याचा हट्ट केला आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर सोमय्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

अमरावतीमध्ये रझा अकादमी व भाजपच्या बंदनंतर अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली व व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचा पत्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं. मात्र, अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर इथे जागा रिक्त

तथापि किरीट सोमय्या यांनी आपण अमरावतीमध्ये दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असे सांगितले आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी सोमय्या  यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

सोमय्यांनी आमचा जिल्हा भडकू नये-यशोमती ठाकूर

दरम्यान,  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पंधरा दिवसानंतर अमरावती मध्ये यावे, अमरावतीमध्ये येऊन त्यांना हिंसाचार भडकवायचा आहे का? असा सवाल देखील सवाल देखील यशोमती ठाकुर यांनी उपस्थित केला आहे. अमरावतीमध्ये येऊन नौटंकी करू नये. आमचा जिल्हा आमचं गाव त्यांनी भडकू नये, असंही ठाकूर म्हणाल्या.

शिवसेना व राष्ट्रवादीची चौकशी करा,अनिल बोंडे यांची मागणी

तर दुसरीकडे, अमरावती शहरात रझा अकादमी संघटनेने मोर्चा काढून हिंसा केली असा आरोप भाजप कडून होतोय तर रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर माजी कृषी मंत्री व भाजप नेते अनिल बोंडे यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. 'आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आर आर पाटील गृहमंत्री असताना याच रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत महिला पोलिसांवर सुद्धा हल्ला केला होता. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी यांचे रझा अकादमीचे संबंध आहे ते उकरून काढावे व रजा अकादमी संबंधीत संजय राऊत असून त्यांची चौकशी करा, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

First published:

Tags: Kirit Somaiya