मुंबई 14 मार्च : CSMT जवळ घडलेल्या पूलाच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यात जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा करू असंही त्यांनी सांगितलं. घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली.
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांच्याकडून घटनेची माहिती घेतल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणाले. काही वर्षांपूर्वी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. त्यात हा पूल सुस्थितीत असल्याचं आढळून आलं होतं. असं असतानाही ही दुर्घटना का घडली हा चिंतेचा विषय आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis: Ex-gratia of Rs 5 Lakh each will be given to the families of those who died in the incident and compensation of Rs 50,000 each will be given to the injured, state govt will provide for their treatment. https://t.co/oJZV1g8Uhg
— ANI (@ANI) March 14, 2019
नेमकं काय झालं?
दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. संध्यकाळच्या सुमारास या पुलाचा काही भाग खाली कोसळला. त्यानंतर प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली असलेल्या काही गाड्यांचं नुकसान झालं. यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झालेत.
NDRF घटनास्थळी
मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले. जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे. NDRF च्या पथकानेही घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत कार्याला सुरूवात केली.
कसाबचा पूल
मुंबईतला सर्वाधिक महत्त्वाचा आणि अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या CSMT जवळचा एक पूल गुरूवारी रात्री कोसळला. या ब्रिजचं दुसरं नाव आहे कसाबचा पूल . आज हाच पूल मृत्यूचा सापळा बनला.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. या हल्ल्यातला जिंवत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाबने सीएसटीमध्ये गोळीबार केल्यानंतर तेथून टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीकडे परत येताना या पुलाचा वापर केला होता. या पुलावर त्याचा फोटोही घेतला गेला. अंधाधुंद गोळीबार करून करून तो पुलावरून खाली उतरला आणि टाईम्सच्या एका गल्लीतून कसाब आणि इतर दहशतवादी कामा हॉस्पिटलकडे गेले. त्यामुळे नंतर या पुलाला कसाबचा पूल असंच नाव पडलं.