...पण मुंबईकरांचे गेलेले प्राण पुन्हा येणार नाहीत : रोहित पवार

...पण मुंबईकरांचे गेलेले प्राण पुन्हा येणार नाहीत : रोहित पवार

दुर्घटना घडल्यावर सरकार मदत करते पण घराचा आधार गेल्याचं दु:ख काय असतं ते पहावं असं रोहित पवार म्हणाले.

  • Share this:

अहमदनगर, 15 मार्च : सीएसएमटी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना घडल्यावर सरकार मदत करते पण घराचा आधार गेल्याचं दु:ख काय असतं ते पहावं असं रोहित पवार यांनी अहमदनगर येथे बोलताना सांगितले.

रोहित पवार म्हणाले की, सीएसएमटी दुर्घटनेत काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी आहेत. यापुर्वीही असे प्रकार झाले असून पूल कोणाच्या हद्दीत आहे यावर चर्च होत असल्याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. दुर्घटना घडून गेल्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात येते. त्यानंतर त्यावर चर्चा होते. पूलाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महानगर पालिका किंवा सीएसआरडीकडे द्यावे असेही त्यांनी म्हटले.

गेल्या वेळेस जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा देखील असाच वाद होता की पुलाची जबाबदारी कोणाची. रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन या वादात जबाबदारी झटकली जावू शकते पण सर्वसामान्य मुंबईकरांचे गेलेले प्राण पुन्हा येवू शकत नाहीत. पादचारी पुलाचा वापर प्रामुख्याने नोकरदार, सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातो. एखाद्या घरातला कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्या घरावर कोणता प्रसंग येतो हे आपण सांगू देखील शकणार नाही. लवकरात लवकर अशा पुलांची जबाबदारी प्रशासनाने निश्चित करुन यापुढे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असे रोहित पवार यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

सीएसएमटी इथं पादचारी पुल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुलाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

First published: March 15, 2019, 1:11 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading