VIDEO क्रुझर व मारुती सुझुकीची भीषण धडक, कार जळून खाक; दोन महिला भाजल्या

VIDEO क्रुझर व मारुती सुझुकीची भीषण धडक, कार जळून खाक; दोन महिला भाजल्या

  • Share this:

जुन्नर 16 जून: अहमदनगर-कल्याण महामार्गावर  बेल्हे गावाजवळ  गुंजाळवाडी फाटा नजीक स्वामी समर्थ लॉन समोर क्रुझर व मारुती सुझुकी इको या कारची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात  दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत.   मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास झालेल्या या अपघातात  कैलास नमाजी शिंदे हे कुटुंबाला घेऊन इको कार ने बेल्ह्याहून पुणे येथे घरी जात असताना  दोनी वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली.

या अपघातानंतर इको कारने पेट घेतला. यात 2 महिला देखील भाजल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ रामदास गुंजाळ, बबड्या गुंजाळ आदी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन  पेटलेल्या गाडीतून या तिघांना बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला

पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत. यात नेमकी चूक कुणाची आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत.

First published: June 17, 2020, 12:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या