मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

CRPF च्या जवानानं स्वत: छातीत झाडली गोळी, सुसाईड नोटमध्ये लिहिलं हे कारण

CRPF च्या जवानानं स्वत: छातीत झाडली गोळी, सुसाईड नोटमध्ये लिहिलं हे कारण

भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यात रविवारी ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटना घडली.

भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यात रविवारी ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटना घडली.

भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यात रविवारी ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटना घडली.

गडचिरोली, 26 एप्रिल: केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यात रविवारी ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटना घडली. दीपक कुमार (वय-27) असं मृत जवानाचे नाव असून तो उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. अचानक घडलेल्या या घटनेने पोलीस दल हादरून गेलं  आहे. हेही वाचा..उद्धव ठाकरेंबाबत शिफारस राज्यपालांना पाळणं बंधनकारक, काय म्हणाले घटना तज्ज्ञ दीपक कुमार हा केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन क्रमांक 37 मध्ये कार्यरत होता. त्याने स्वत: कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घालून आत्महत्या केली. दीपक कुमार याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्या या जवानाने आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे दीपक कुमार याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दीपक कुमार यांचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा..‘कोरोना’विरुद्ध WHOने दिला हा नव्या इशारा, जगाची चिंता आणखी वाढली दरम्यान, गेल्या 15 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. अजहर शेख असं या पोलिस अधिकाऱ्यांचं नाव होतं. मालेगावात कोरोना विषाणूनं थैमान घातलं असताना शहरातील पोलिस दलात ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग मालेगावच्या दौऱ्यावर होत्या. तेव्हा ही घटना घडली. अजहर यांनी स्वतःवर गोळी झाडून का घेतली, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. संपादन- संदीप पारोळेकर
First published:

Tags: Suicide

पुढील बातम्या