ठाणे-कल्याणसह पुण्यातही मद्यपींची झुंबड, वाईन शॉपबाहेर मोठी गर्दी

ठाणे-कल्याणसह पुण्यातही मद्यपींची झुंबड, वाईन शॉपबाहेर मोठी गर्दी

गेल्या अनेक दिवसांपासून बंदी असल्याने त्रस्त झालेल्या मद्यपींनी काही ठिकाणी वाईन शॉप सुरू होण्याआधीच मोठ्याच मोठ्या रांगा लावल्याचं चित्र आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर ब्रेक लागलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत आता शहरात वाईन शॉपला परवानगी देण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बंदी असल्याने त्रस्त झालेल्या मद्यपींनी काही ठिकाणी वाईन शॉप सुरू होण्याआधीच मोठ्याच मोठ्या रांगा लावल्याचं चित्र आहे.

वाईन शॉप खुले होण्या आधीच ठाण्यात वाईनशॉपबाहेर गर्दी झाली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील राजू वाईन्सवर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे पुण्यातही अशीच काहीशी स्थिती आहे. दारूच्या दुकानासमोर सकाळपासूनच रांगा लावण्यात आल्या आहेत. वाईन शॉप्स उघडण्यासंबंधी कोणतीही स्पष्टता नाही. मात्र तरीही सकाळपासूनच दारू खरेदीसाठी मद्यपींच्या रांगा पाहायला मिळत आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील हिंगणे परिसरात दारूच्या दुकानासमोर अजूनही लांबच लांब रांग आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी, असा झाला फायदापुण्यातील दारूची दुकानं सुरू होणार की नाही याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसतानाही भांडारकर रोडवर मद्यप्रेमींनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यासंबंधीचं वृत्त 'न्यूज 18 लोकमत'ने दाखवताच पोलीस तिथं आले आणि त्यांनी ती गर्दी हुसकावून लावली.

कल्याण/डोंबिवली परिसरात सकाळपासूनच वाईन शॉपवर लागली रांग...

इतर मोठ्या शहरांप्रमाणेच कल्याण आणि डोंबिवली शहरातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. काही ठिकाणी वाईन शॉप उघडली आहेत तर काही ठिकाणी उघडायची आहेत. मात्र दारू घेण्यासाठी मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 11:42 AM IST

ताज्या बातम्या