गर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं

गर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं

नागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.

  • Share this:

सुरभी शिरपुरकर,नागपूर

27 एप्रिल : गर्दी जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठते तेव्हा काय होतं याचा प्रत्यय आलाय नागपूरमध्ये...नागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.

नागपूरच्या लाखनी तालुक्यात रेंगेपार गावाजवळच्या शेतात बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला. काही क्षणांमध्येच परिसरातल्या लोकांनी आरडाओरडा केला. आणि मोठी गर्दी जमा झाली या गर्दीच्या भीतीने तो बिबट्या जीवाच्या आकांतानं एका नाल्यात शिरला. कधी कधी जमाव किती असंवेदनशील होऊ शकतो याचा प्रत्यय या ठिकाणी आला. या जमावानं नाल्याच्या चारही बाजूंनी आग लावून दिली. चारही बाजूनी आग लावल्याने धुरामुळे बिबट्या नाल्यामध्ये धुसमटला आणि अर्धमेला झाला.

तेवढ्यात वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्धमेल्या बिबट्याला बाहेर काढलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. आणि तेवढ्यात भेदरलेल्या बिबट्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि जमावाचा तोल सुटला.

जमावाने बिबट्याला जिवानिशी मारण्याचा जणू बेत केला होता. आणि झालंही तसंच...जमावाने बिबट्याचे पाय बांधून मारहाण केली..आणि क्रुर मारहाणीत अखेत बिबट्य़ाचा जीव गेला. या तोल सुटलेल्या जमावापुढे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र हतबल होऊन बघत राहिले.

First published: April 27, 2017, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading