बीड, 11 मे: बीड (Bedd) जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात लवकर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन वारंवार खबरदारी घेण्याची सूचना करत आहे. पण, बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनीच सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडवला आहे.
बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते महिलांसाठी कोविड सेंटरचे उद्घाटन पार पडले. पण, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
सार्वजिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार केली जात असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळे नियम आणि मंत्र्यांना वेगळे नियम असता का, असा सवाल या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे.
बीडमध्ये लॉकडाऊन वाढवणार?
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोनाबादित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या बारा हजाराच्या पुढे आहे. त्याच तुलनेने कोरोना मुक्त होणारे देखील दररोज 1000 रुग्ण आहेत.1500 च्या पुढे आढळणारी रुग्ण संख्या 1200 पर्यंत आली आहे. 12 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन असला तरी आणखी वाढवण्याच्या हलाचली सुरू आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातल्याने धोका जास्त वाढला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या टेस्ट करून हॉस्पिटलपर्यंत घेऊन येण्याचं काम केलं जातं आहे. लॉकडाऊन असल्याने शेतकरी आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन नको अशी मागणी व्यपारी वर्गातून देखील होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhananjay munde, Maharashtra, Mumbai