मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Crocodile Safari : रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावाला मगरींमुळे मिळाला रोजगार, दिवसाला कमवतात 10 ते 15 हजार रुपये

Crocodile Safari : रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावाला मगरींमुळे मिळाला रोजगार, दिवसाला कमवतात 10 ते 15 हजार रुपये

(Crocodile Safari (crocodile spotting) in Ratnagiri district) रत्नागिरीतील खेड येथील कोनगाव येथे मँग्रोव्ह सेलतर्फे ३ मेपासून मगर दर्शन सफारी सुरू करण्यात आली आहे.

(Crocodile Safari (crocodile spotting) in Ratnagiri district) रत्नागिरीतील खेड येथील कोनगाव येथे मँग्रोव्ह सेलतर्फे ३ मेपासून मगर दर्शन सफारी सुरू करण्यात आली आहे.

(Crocodile Safari (crocodile spotting) in Ratnagiri district) रत्नागिरीतील खेड येथील कोनगाव येथे मँग्रोव्ह सेलतर्फे ३ मेपासून मगर दर्शन सफारी सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी, 08 मे : पर्यटन आणि संवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि Mangrove Cell यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यात मगरींचे दर्शन (crocodile safari) करण्यासाठी एक उपक्रम राबवला जात आहे. (Crocodile Safari (crocodile spotting) in Ratnagiri district) रत्नागिरीतील खेड येथील कोनगाव येथे मँग्रोव्ह सेलतर्फे 3 मेपासून मगर दर्शन सफारी सुरू करण्यात आली आहे. वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर हा उपक्रम सुरू आहे.

सोनगाव इकोटूरिझम हा स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी आणि खारफुटी आणि सागरी जैवविविधता संवर्धनासाठी राज्य वन विभागाच्या खारफुटी आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन उपक्रमाचा एक भाग आहे. गावातील खारफुटीच्या ठिकाणी सुमारे सहा महिने दररोज प्रशिक्षण घेतल्यानंतर, सुमारे 30 गावकरी पर्यटकांना खारफुटीच्या पायवाटेवर घेऊन जातात.

हे ही वाचा : घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा, साताऱ्यातल्या घटनेनं खळबळ

जे पर्यटक  येतात त्यांना बोटीतून मगरींचे दर्शन घडवून आणतात. याचबरोबर या नदीच्या किनाऱ्यावर अन्य पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतात. यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वाढत आहेत. दरम्यान पर्यटकांना राहण्यासाठी सोनगावमध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा देण्यात आली आहे. (crocodile safari)

वाशिष्ठी नदीत घोडेखोर किंवा दलदलीच्या मगरीची अधिकृत गणना नसताना, स्थानिकांनी वाशिष्ठी नदीच्या बॅकवॉटरमध्ये एका बोटीत सुमारे 20 जणांना पाहिले होते. दरम्यान 2019 ते 2021 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात, Ela Foundation या NGO ला आणि वाशिष्ठी नद्यांमध्ये 107 मगरी आढळल्या.

मगर (Crocodylus Palustris), ज्याला मार्श क्रोकोडाइल देखील म्हणतात, मूळ भारतीय उपखंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, पाकिस्तान आणि इराणच्या काही भागात असा प्रदेश आहे. वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-I मध्ये मगरींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे वन्य प्राण्यांना जास्तीत जास्त कायदेशीर संरक्षण मिळेल. दरम्यान या प्रजातींचे अस्तीत्व धोक्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकणातील बऱ्यापैकी लोक शहरात रोजगाराच्या निमीत्ताने बाहेर पडत असतात. सोनगावातही अशीच अवस्था होती. हे लक्षात आल्यानंतर Mangrove Cell या संस्थेने रोजगार निर्मिती म्हणून पर्यावरण पर्यटनाला चालना देत आहे.

दरम्यान तेथील स्थानिक झवेरी म्हणाले की, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६ या दरम्यान मगर सफारी केली जाते. नदीच्या स्थितीवर मगरींचे प्रमाण दिसून येते. नदीला भरती कमी असल्यावर मगरी मोठ्या प्रमाणात दिसतात. याामुळे पर्यटकांनी या काळात आल्यास मगरींचे दर्शन होईल. दरम्यान सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची सख्या जास्त असल्यास आम्हाला 10 ते 15 हजार रुपयांची कमाई होते. याचबरोबर आम्ही पर्यटकांची राहण्याची सोय देखील करत असल्याचे झवेरी म्हणाले.

First published:

Tags: Crocodile, Ratnagiri, Sea