मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिल्लक सेनेतील सकाळचा भोंगा म्हणजे संजय राऊत त्यांना XX'; शिंदे गटाचा जोरदार पलटवार

'शिल्लक सेनेतील सकाळचा भोंगा म्हणजे संजय राऊत त्यांना XX'; शिंदे गटाचा जोरदार पलटवार

संजय राऊत

संजय राऊत

शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता राऊत यांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. शिल्लक सेनेतील सकाळचा भोंगा म्हणजे संजय राऊत असा घणाघात मस्के यांनी केला आहे.

मस्के यांनी नेमकं काय म्हटलं?

नरेश मस्के यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अब्दुल सत्तार यांना दुसऱ्याच्या पक्षातून शिवसेनेमध्ये घेताना उध्दव ठाकरे यांना ते गटार वाटले नाहीत का ? असा सवाल नरेश मस्के यांनी केला आहे. तसेच शिल्लक सेनेतील सकाळचा भोंगा म्हणजे संजय राऊत आहेत,  त्यांना आमच्या विरोधात बोलण्याची ड्युटी दिली आहे, त्यांना ती करू द्या असा टोला मस्के यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

हेही वाचा :  मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील दुफळी समोर

संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं? 

संजय राऊत यांनी बुलडाण्यात झालेल्या सभेमध्ये शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता.  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडातून वेद बोलवले. मात्र मुख्यमंत्री रेडे घेऊन कामाख्या देवीला गेल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. रेड्यांचा राजकीय बळी घ्यायलाच हवा असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या टीकेला आता नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Mumbai, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray