मुंबई, 9 डिसेंबर: कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढावा, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आपण स्वत: बेळगावात जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यासाठी त्यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र आता हा 48 तासांचा अल्टिमेटम उलटून गेला आहे. यावरून शिंदे गटाने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. 'ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? गेले आहेत? की फक्त "कर नाटक"?' असं ट्विट शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी केलं आहे. यावरून आता शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
भाजपाचा निशाणा
दरम्यान दुसरीकडे याच मुद्द्यावरून शरद पवार यांना भाजपाने देखील टोला लगावला आहे. 'ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं?' असा सवाल ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग न निघाल्यास आपण बेळगावात जाणार असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
हेही वाचा : '...हे तर महाराष्ट्राचं दुर्दैव', महाविकास आघाडीच्या बिघाडीवर आव्हाडांची खंत
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
दुसरीकडे महाविकास आघाडीमधील बिघाडी आता समोर आली आहे. आज महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीला सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Karnataka, NCP, Sharad Pawar, Shiv sena