मुंबई, 9 ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात संभाजी राजेंसह अनेकांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यात ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी प्रश्न अजून सुटलेला नाही. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. यापूर्वी ओबीसी नेते एमपीएससीची परीक्षा घेण्यावर ठाम होते. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्रीवर बैठक सुरू आहे.
हे ही वाचा-MPSC Exam: ‘राज्य सरकारवर दबाव नाही’, निर्णयानंतर अशोक चव्हाणांचा निर्वाळा
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून वारंवार होत होती. ठाकरे सरकारने अखेर मोठा निर्णय घेत राज्य सेवा मंडळाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्याद्यांना त्रास होऊ नये यासाठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे MPSC परीक्षा येत्या 11 आॅक्टोबरला होणार होती. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा धोका आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आल्या कारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.