नागपूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', त्याने आधी एकाला संपवलं मग गँगने भोजनालयात घुसून घेतला बदला

नागपूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', त्याने आधी एकाला संपवलं मग गँगने भोजनालयात घुसून घेतला बदला

साथीदाराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शहरातील सावजी भोजनालयात चाकूने वार करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली

  • Share this:

नागपूर, 08 जानेवारी : पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर मुळशी पॅटर्न सिनेमा चांगलाच गाजला. दोन गँगमधील बदला आणि सुडाचे रक्तरंजीत चित्र या सिनेमात दाखवण्यात आले तशीच एक घटना नागपूरमध्ये घडली.  साथीदाराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शहरातील वनदेवीनगरमधील आर. के. सावजी भोजनालयात चाकूने वार करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली.

समीर ऊर्फ बाबा या गुन्हेगाराची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मे २०१७ मध्ये समीर आणि त्याचा साथीदार फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान या दोघांनी कुख्यात प्रवीण ऊर्फ प्रकाश (वय २२) याची हत्या केली होती. त्यामुळे प्रवीण याचे साथीदार संतापले होते. समीर याचा खून करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. त्यामुळे प्रवीण याच्या साथीदारांनी समीर याचा काटा काढण्याच्या कट आखला.

मंगळवारी रात्री समीर हा वनदेवीनगर भागात एकटा असल्याची माहिती मिळताच मारेकरी त्याचा पाठलाग करायला लागले. बचावासाठी समीर आर. के. सावजी भोजनालयात घुसला. प्रवीणचे साथीदारही त्याच्या मागोमाग भोजनालयात घुसले. चाकूने सपासप वार करून समीरची हत्या केली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

दगडाने ठेचून हत्या

दरम्यान, शहरामध्ये दोन हत्याकांडाने खळबळ उडाली असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना वाठोडा पोलीस स्टेशनअंतर्गत गंगा सेलिब्रेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने डोके ठेचून २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. मृतकाची ओळख पटलेली नाही. तो मजूर असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

Published by: sachin Salve
First published: January 8, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading