बाळासाहेब काळे (प्रतिनिधी),
पुरंदर, 2 मे- सराईत गुन्हेगारावर गोळ्या झाडल्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हसन शेख (रा. वडगाव धायरी, सिंहगड रोड) असं हत्या झालेल्या गुन्हेगारचं नाव आहे. कोडी इथे गुरुवारी ही घटना घडली आहे.
गुंड हसन शेख नारायणपूरकडून पुण्याकडे ब्रेझा कारने येत होता. पुण्यावरून बोलेरो जीप व दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गाडी अडवून हसन शेखवर गोळ्या झाडल्या. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. संशयितांची नावेही पोलिसांना माहीत झाली आहे. तपासासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत.
वडगाव धायरी येथील गुंड हसन अब्दुल जमील शेख याची गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील कोडीत गावचे हद्दीत नारायणपूर रोडवर बोलेरो जीप आणि दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हत्या केली. मारेकऱ्यांनी हसन शेख याची ब्रेझा कारला धडक देऊन पिस्तुलातून गोळ्या झाडल्या तर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांने कोयत्याने वार करून खून केला. खून करून हल्लेखोर पळून गेले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी ब्रेझा कार व बोलेरो जीप, तसेच पिस्तूलातुन झाडलेल्या गोळ्यांच्या 13 पुंगळ्या आढळून आल्या आहेत. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस निरीक्षक जयंत मीना, विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जमिनीच्या वादातून खून झाला असल्याची माहिती मिळत असून पोलिसांना संशयित आरोपींची नावे मिळालेली आहेत. तपासासाठी चार पथके निर्माण करून तपासला सुरुवात करण्यात आली आहे.
गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO