Home /News /maharashtra /

मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेही होते सहभागी

मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेही होते सहभागी

तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्चात सुमारे 2500 लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोविड -19 च्या प्रसाराची शक्यता निर्माण केली.

पुढे वाचा ...
उस्मानाबाद, 11 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे. दोन दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण 7 जणांवर तुळजापूर पोलिसात 10 ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  कोविड प्रसाराची शक्यता निर्माण केली आणि निष्काळजीपणाचे कृत्य केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परळीत राबवणार बारामती पॅटर्न, झोपडपट्टीमुक्त शहरासाठी धनंजय मुंडेंचा निर्धार तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्चात सुमारे 2500 लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोविड -19 च्या प्रसाराची शक्यता निर्माण केली. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक सज्जन साळुंके, जिवन इंगळे, अर्जुन साळुंके, महेश डोंगरे, धैर्यशील पाटील, सुनिल नागने आणि अजय साळुंके यांच्यावर भा.दं.सं.कलम 188, 269, 270 आणि म.पो.का. कलम-135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सु्द्धा हजर होते. MPSC परीक्षा अखेर लांबणीवर दरम्यान, मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनामुळे MPSC परीक्षा अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत चर्चा करून  MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विविध मराठा संघटनांनी या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. खासदार संभाजीराजे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरणक्षाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत या परीक्षा घेऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. तर दुसरीकडे  MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केलं. राज्य सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या