Home /News /maharashtra /

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, अकोला आणि नेरुळमध्ये गुन्हा दाखल

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, अकोला आणि नेरुळमध्ये गुन्हा दाखल

 केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती.

केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती.

केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती.

    किशोर गोमाशे, प्रतिनिधी अकोला, १५ मे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या थरावर जाऊन फेसबुक पोस्ट (facebook post) करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या (ketaki chitale) अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्यात (akola) गुन्हा दाखल झाल्यानंतर आता केतकी चितळेवर नेरूळ पोलीस ठाण्यात (nerul police station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अकोला पोलीस सुद्धा केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह शब्दात टीका केली होती. केतकीने तिच्या फेसबुकवर कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला होता. या प्रकारानंतर अकोल्यात राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर केतकी हिच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ('ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान) केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली जात आहे. अकोल्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केतकीच्या कृत्यावर टीका केली. तर राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार देत तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सद्यस्थित खदान पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अधिक तपास खदान पोलीस करत आहे. गरज भासल्यास केतकी चितळे हिला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नेरुळमध्येही गुन्हा दाखल शरद पवार यांच्यावर केलेल्या अपमानकारक पोष्ट संदर्भात केतकी चितळे हिच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुमीत्रा पवार यांनी केला असून,१५३A,५००,५०१,५०५(२), अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. याची पुढील कारवाई नेरूळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करणार आहेत. मात्र आता राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केतकीने शरद पवारांवर काय पोस्ट केली होती? शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह मजकूर लिहिले की 'तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, अशी झाले आता उरक वाट पाहतो नरक, सगळे पहले उरले सुळे सतरा वेळा समर्थांचे काढतो माप' ...  या आक्षपार्ह मजकुर वकील नितीन भावे यांचं नाव नमूद असलेली शरद पवार यांच्या विषयी व्देष बदनामीकारक पोस्ट केलेली आहे. सदर फेसबुक अकाऊंटवर केतकी चितळे हिने राजकीय आणि प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या संबंधाने पोस्ट केल्यामुळे दोन समाज व समूह गटामध्ये द्वेशाचीभावना आणि वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे. त्यामुळेच आधी नवी मुंबई, ठाणे, अकोला आणि आता नेरळमध्येही तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या