पुण्यात 'क्राईम पेट्रोल' सिरीयल बघून केली चोरी, तक्रार करणाराच निघाला आरोपी

पुण्यात 'क्राईम पेट्रोल' सिरीयल बघून केली चोरी, तक्रार करणाराच निघाला आरोपी

कर्ज फेडण्यासाठी मित्राच्या मदतीने चोरी केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे.

  • Share this:

अनिस शेख, पुणे, 17 ऑगस्ट : पैशाची उधळपट्टी करण्याची लागलेली सवय तसेच फ्लॅटसाठी घेतलेलं दहा लाखांचं कर्ज फेडण्यासाठी मित्राच्या मदतीने चोरी केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. पोलिसांनी 12 तासाच्या आत या चोरीचा छडा लावला आहे. यामध्ये पोलिसांनी कुणाल पवार या आरोपीला अटक करून तब्बल 34 लाख 26 हजार रुपये हस्तगत केले आहेत.

हातउसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी पुण्यातील विमान नगर इथं राहणाऱ्या कुणालने क्राईम पेट्रोल सिरीयल बघून लाखो रुपये चोरण्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत आरोपीचा हा डाव 12 तासात उघड झाला आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या दरोड्याच्या घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झालं. देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोघांकडून चोरी केली गेलेली रक्कम जप्त करण्यात केली.

पुणे विमान नगर येथील लॉजी कॅश या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुणाल पवार या कर्मचाऱ्याने विविध एजन्सी मधून 34 लाख 30 हजार जमा केले होते. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरून खाली पाडून मला बंदुकीचा धाक दाखवून पैसे हिसकावून नेल्याची तक्रार कुणाल पवारने देहूरोड पोलिसाकडे केली. पण पहिल्या जबाबापासूनच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कुणालनेच ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यानंतर पोलिसांनी कुणालच्या मोबाईलचे कॉल लॉग तसेच त्याने डिलिट केलेले मेसेज सायबर सेलच्या मदतीने पुन्हा रिकव्हर केले. यामध्ये पोलीसांना यश आल्याने या चोरीचा उलगडा झाला. 'क्राईम पेट्रोल' ही सिरीयल पाहून केलेल्या चोरीमध्ये कुणाल तसेच त्याचा सोबत असलेला त्याचा मित्र ओंकार भोंगडे या दोघांनी मिळून चोरी झाल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: #Pune
First Published: Aug 17, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading