कोल्हापूर, 02 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये एका विवाहितेचा खून तिच्या पतीनेच केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वंदना संगमेश्वर कोणकेरी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती संगमेश्वर कोणकेरीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज तालुक्यातील जरळी येथे शेतवडीत 10 ते 11 घरे असलेली कोणकेरी वसाहत आहे. याच वसाहतीत संगमेश्वर कोणकेरी हा पत्नीसह विभक्त राहतो. 2013 साली संगमेश्वर आणि वंदनाचं लग्न झालं होतं. त्यांना एक चार वर्षांची मुलगी आहे.
वंदना रोज सकाळी दूध आणण्यास यायची. ती आज का आली नाही म्हणून वंदनाची सासू त्याच्या घरी गेली असता वंदना ही अंथरूणावरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. तिने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
हेही वाचा -सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, FB पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या
वंदना हिच्या खांदा आणि मानेवर धारधार शस्त्राने वार झाल्याचे दिसून आले. दरम्यान संगमेश्वर हाही घरात दिसत नसल्याने त्याने रात्रीच वंदना हिचा खून करून पळ काढल्याचं समोर आलं.
तिचा पती संगमेश्वर लक्ष्मण कोणकेरी हा पहाटेपासून फरार होता. अखेर घराजवळच्या मक्याच्या शेतातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
हेही वाचा -VIDEO : कोण पंत? ऋषभने रोहितला दिलेल्या सिक्सर चॅलेंजवर भडकला हिटमॅन
संगमेश्वर याची मुलगी आपल्या आजीकडे गेली होती. त्यामुळे संगमेश्वर आणि त्याची पत्नी हे दोघेच घरी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणं होत होती. याच कारणातून रागाच्या भरात त्याने खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणी, आरोपी संगमेश्वरला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.