Elec-widget

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, मुलांना विष पाजून दाम्पत्यानं घेतला गळफास

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, मुलांना विष पाजून दाम्पत्यानं घेतला गळफास

सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

सोलापूर, 24 सप्टेंबर : सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली आहे. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष पाजून त्यानंतर कोकाटे दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

(वाचा :पत्नीचा फोन सतत असायचा बिझी, पतीनं हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे-तुकडे)

भैरवनाथ कोकाटे (वय 40 वर्ष), मनिषा भैरवनाथ कोकाटे (वय 36 वर्ष), प्रशांत कोकाटे (वय 15 वर्ष) आणि प्रतीक्षा कोकाटे (वय 11 वर्ष)अशी मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.

(वाचा :हायप्रोफाईल डबल मर्डर! मित्राच्या गर्लफ्रेंडवर रेप करण्याचा प्लान फसला म्हणून...)

विहिरीत आईसह 4 चिमुकल्यांचा सापडला मृतदेह

Loading...

दरम्यान, बुलडाण्यामध्ये सोमवारी (23 सप्टेंबर) एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. आईसह चार मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला होता. या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला.

(वाचा : मुलीशी अश्लील चाळे करत होता 'मास्तर', आईच्याच आले निदर्शनास)

मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आई उज्ज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...