भाऊबीजेच्या तोंडावर बहिणीची रक्षा करणाऱ्या भावाला संपवलं, भर रस्त्यात केले सपासप वार!

भाऊबीजेच्या तोंडावर बहिणीची रक्षा करणाऱ्या भावाला संपवलं, भर रस्त्यात केले सपासप वार!

रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह चौकात पडला असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 26 ऑक्टोबर : सध्या गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असताना आता एका खूनाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 4 युवकांनी धारदार शस्त्राने एका तरुणाला भर दिवसा चौकात सगळ्यांच्या समोर ठार केलं आहे. रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह चौकात पडला असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. बहिणीची छेड काढण्यावरून हा रक्ताचा पाठ वाहिला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरातील घुटकाळा भागातल्या नेहरू शाळेसमोर भर दुपारी हा खून झाला आहे. बहिणीची छेड काढल्यामुळे भावाने काही तरुणांना दम भरला आणि शिवीगाळ केली. याचा राग मनात ठेवत 4 तरुणांनी भावालाच संपवल्याचं सांगण्यात येत आहे. अक्षय बलवंत मुन असं 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. 4 आरोपी तरुणांनी अक्षयच्या बहिणीची छेड काढली होती. हा सगळा प्रकार बहिणीने अक्षयला सांगितला आणि त्याचा पारा चढला.

अक्षयने बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणांना गाठलं आणि त्यांना दम भरत शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ केल्याचा राग आरोपी तरुणांच्या मनात होता. 4 युवकांनी अक्षयला नेहरू शाळेसमोर चौकात गाठलं आणि भर दिवसा त्याच्यावर चौघांनी धारदार शस्त्राने वार केले. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शरीरावर अनेक जबर वार झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्या - राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भूमिकेनंतर शिवसेनेला धक्का, कोण असेल पुढचा मुख्यमंत्री?

भर रस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. भावाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर अक्षयच्या बहिणीने आणि कुटुंबाने हंबरडा फोडला. या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घडनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता संपूर्ण प्रकरणाता तपास घेत आरोपीचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या - वडिलांनी केला 8 महिन्याच्या निष्पाप मुलीचा खून, जमिनीवर आपटून केलं ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Oct 26, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading