पती, पत्नीने दीड वर्षाच्या मुलीसह विष पिऊन घेतली फाशी

पती, पत्नीने दीड वर्षाच्या मुलीसह विष पिऊन घेतली फाशी

लहान आर्वी येथील घटनेने सध्या संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कारण इथं एका पती पत्नीने आपल्या दीड वर्षांच्या चुमकलीसह स्वत:ला फाशी लावून घेतली आहे.

  • Share this:

वर्धा, 13 जून : लहान आर्वी येथील घटनेने सध्या संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कारण इथं एका पती पत्नीने आपल्या दीड वर्षांच्या चुमकलीसह स्वत:ला फाशी लावून घेतली आहे. फाशी लावून घेण्याआधी त्यांनी विष घेतलं आणि मग स्वत:ला फाशी लावून घेतली.

आष्टी(शहीद) तालुक्यातील लहान आर्वी येथील अनिल नारायण वानखडे वय 37, पत्नी स्वाती अनिल वानखडे, मुलगी आस्था वय दीड वर्ष या तिघांनी वडिलांशी झालेल्या वादातून काल सायंकाळी 7 वाजता घराबाहेर पडत विषारी औषध विकत घेतलं.

अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात विष प्राशन करून झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली आहे. स्थानिकांनी त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिले आणि यासंदर्भातली माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पोलीस सध्या हा प्रकरणाचा पंचनामा करत आहेत.

 

हेही वाचा...

भय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला ! सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती

भैय्यूजी महाराजांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी

नियंत्रण रेषेवर पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे 4 जवान शहीद

First published: June 13, 2018, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading