• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज कुंद्रा अटकेनंतर शिल्पा शेट्टीचीही चौकशी सुरू; Mumbai Crime Branch ची टीम पोहोचली घरी

राज कुंद्रा अटकेनंतर शिल्पा शेट्टीचीही चौकशी सुरू; Mumbai Crime Branch ची टीम पोहोचली घरी

सॉफ्ट पॉर्न(Soft porn case) प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) कंपनीत त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नेमका काय सहभाग होता, याबाबत तिची जबानी गुन्हे शाखेनं (Crime Branch) नोंदवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै : सॉफ्ट पॉर्न(Soft porn case) प्रकरणात  पोलिसांनी अटक केलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) कंपनीत त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नेमका काय सहभाग होता, याबाबत तिची जबानी गुन्हे शाखेनं (Crime Branch) नोंदवली आहे. राज कुंद्राच्या कंपनीत शिल्पा शेट्टीचा नेमका काय सहभाग होता, सॉफ्ट पॉर्न व्हिडिओसंदर्भात तिला नेमकी काय माहिती आहे, अशा अऩेक प्रश्नांची उत्तरं तिच्याकडून मिळतील, अशी गुन्हे शाखेला अपेक्षा आहे. 1 टीबी डेटा डिलिट सॉफ्ट पॉर्न प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सर्व्हरवरून जवळपास 1 टीबीचा डेटा डिलिट करण्यात आला आहे. त्यामुळ गुन्हे शाखेकडं असणारे काही महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले असून राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात असताना हे व्हिडिओ कुणी डिलिट केले, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. त्यासाठी राज कुंद्राच्या कार्यालयाचं आणि इतर संभाव्य ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. याबाबत शिल्पा शेट्टी काही माहिती देते का, याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. पतीच्या कंपनीशी संबंध राज कुंद्राच्या विआन या कंपनीत शिल्पा शेट्टी 2020 सालापर्यंत संचालकपदी कार्यरत होती. सध्या समोर येत असलेलं सॉफ्ट पॉर्न प्रकरण हे शिल्पा शेट्टीच्या राजीनाम्यानंतर सुरु झाल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासातून पोलिसांना मिळाली आहे. नेमकं असं घडलं, ज्यामुळे शिल्पा शेट्टीनं कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला, या प्रश्नावर शिल्पा शेट्टीचं उत्तर पोलीस तपासात महत्त्वाचं ठरणार आहे. हे वाचा -BREAKING: राज कुंद्राला कोर्टाचा फटका; 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी कायम बँक खात्यांची होणार तपासणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचीदेखील गुन्हे शाखेकडून तपासणी केली जाणार आहे. सॉफ्ट पॉर्न प्रकऱणाशी संबंधित काही आर्थिक व्यवहार शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यातून झाले का, याचा तपास पोलीस घेणार आहेत. त्याचप्रमाणं राज कुंद्राच्या ऑनलाईन बेटिंगमध्ये शिल्पा शेट्टीचा सहभाग होता का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.
  Published by:desk news
  First published: