बारामती, 3 मार्च : बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे 3 मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. यावेळी एका ऑनलाइन मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रोख रखमेसह मुद्देमाल जप्त केला आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर शहरामध्ये अवैध मटका जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या नेतृत्वाखालील बारामती क्राईम ब्रांचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये सहा अरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रखमेसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या परिसरात तीन ठिकाणी हा झुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाल्यानुसार छापा टाकण्यात आला. यावेळी ऑनलाईन पध्दतीने मटका जुगार चालवला जात होता. मटका मालक हा एजंट मार्फत जुगाराच्या ठिकाणी आकड्यांवर लोकांकडून पैसे लावून जय-पराजयचा खेळ खेळवून घेत होते.
हेही वाचा-भक्तांना प्रसाद म्हणून चहामध्ये दिलं चक्क पेट्रोल, गुन्हा दाखल होताच महाराज फरार
या ठिकाणी पोलिसांनी 35 हजार 130 रुपये एकूण रोख रक्कम आणि 21 हजार 500 रूपयांची मटका जुगार घेण्याची साधने-पेन, मटका बुके आणि ऑनलाइन मटका खेळण्याचे साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे
1) राजेंद्र अरुण भांडवलकर रा. सोमेश्वर ता. बारामती जि. पुणे (मटका मालक)
2) मंगेश प्रकाश जगताप रा. मूर्टी ता. बारामती जि. पुणे
3) भगवान रामलिंग सोनवणे रा . सोमेश्वर
4) विशाल सर्जेराव गायकवाड रा. सोमेश्वर
5) बाळासाहेब सदाशिव पवार रा सोमेश्वर
6) सौरभ विश्वास मोरे रा. मूर्ती तालुका बारामती
या सहा आरोपींविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.