अष्टपैलू क्रिकेटपटूसह आईने प्राशन केलं विष, यामुळे उचललं टोकाचं पाऊल!

अष्टपैलू क्रिकेटपटूसह आईने प्राशन केलं विष, यामुळे उचललं टोकाचं पाऊल!

'मदर्स डे'च्या एक दिवसआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्रिकेटपटूसह त्याच्या आईने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. विरारमधील नारंगी येथील साई हेरिटेज या बिल्डिंगमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विनय प्रकाश चौगूले उर्फ दादू (वय-25) असे क्रिकेटपटूचे तर सरस्वती प्रकाश चौगूले (वय-42) असं त्याच्या आईचं नाव आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे- 'मदर्स डे'च्या एक दिवसआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्रिकेटपटूसह त्याच्या आईने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. विरारमधील नारंगी येथील साई हेरिटेज या बिल्डिंगमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विनय प्रकाश चौगूले उर्फ दादू (वय-25) असे क्रिकेटपटूचे तर सरस्वती प्रकाश चौगूले (वय-42) असं त्याच्या आईचं नाव आहे. आर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

विनय हा अष्टपैलू क्रिकेटपटू होता..

विनय आणि त्याची आई विरारमधील नारंगी येथील साई हेरिटेज या बिल्डिंगमध्ये रहात होते. विनय हा अष्टपैलू क्रिकेटपटू होता. तो विरारच्या साईबाबा या क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळत होता. त्याने अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. एका ठिकाणी तो पार्टटाईम नोकरी करत होता. मात्र, त्याला नेहमीच आर्थिक चणचण भासत होती. त्याच्यावर कर्जही झाले होते.

आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विनय आणि सरस्वती यांचा मृतदेह घरात सापडले. सरस्वती या त्यांच्या पतीपासून वेगळ्या रहात होत्या. दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून मायलेकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

VIDEO: अंधेरी स्टेशनमध्ये अवंतिका एक्सप्रेस अंगावरून धावल्यानंतरही 'तो' सहीसलामत!

First published: May 11, 2019, 7:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading