मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लय भारी! मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलांनी 5 एकर शेतातच तयार केलं जबरदस्त मैदान

लय भारी! मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलांनी 5 एकर शेतातच तयार केलं जबरदस्त मैदान

 एखाद्या गोष्टीच्या हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. आपली हौस पूर्ण करण्यासाठी वाट्टेल तितका खर्च केल्याची उदाहरणं जगभर आढळतात. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील अनवलीमधील शेतकऱ्यानं याचं नवं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

  • Published by:  News18 Desk
पंढरपूर, 31 मे : एखाद्या गोष्टीच्या हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. आपली हौस पूर्ण करण्यासाठी वाट्टेल तितका खर्च केल्याची उदाहरणं जगभर आढळतात. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील अनवलीमधील शेतकऱ्यानं याचं नवं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. त्याने मुलाची क्रिकेट खेळण्याची सोय व्हावी म्हणून चक्क पाच एकर शेतामधील द्राक्षबाग तोडून त्यावर दर्जेदार क्रिकेटचं मैदान (cricket ground) तयार केले आहे. अनवलीच्या बाळासाहेब सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची आवड आहे. तो गेल्या वर्षी नंदूरबार जिल्ह्याकडून 14 वर्षांखालील गटातील स्पर्धा खेळला आहे. तसंच पुण्यात त्याच्या नेतृत्वाखाली टीमनं दोन स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. अभियश लॉकडाऊनमुळे गावी परतला आहे. गावी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी नीट मैदान नाही. अभियशची ही अडचण बाळासाहेबांनी ओळखली. त्याच्या सरावात कुठेही खंड पडू नये म्हणून त्यांनी शेतात राष्ट्रीय स्तरावरील मैदान उभारण्याचे ठरवले. राष्ट्रीय दर्जाचे 4 पिच बाळासाहेबांनी त्यांच्या पाच एक द्राक्षाच्या शेतीमध्ये हे मैदान तयार करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी यासाठी संपूर्ण रान अडीच फूट मातीने भरुन घेतले. मुंबईहून पिच आणि मैदानावरील गवत लावण्याचे काम सध्या सुरु आहे. या मैदानात राष्ट्रीय दर्जाचे 4 पिच (Pitch) 2 प्रॅक्टिस पिच आणि 2 सिमेंटची पिच तयार करण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती बाळासाहेबांनी दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या पीच क्युरेटरनी देखील खास अनवलीमध्ये येऊन या मैदानाची पाहणी केली. त्यांनी देखील मैदानाचे काम योग्य पद्धतीने सुरु असल्याचे सांगितले आहे. या मैदानाचे काम सुरु असताना अभियशच्या सरावात खंड पडणार नाही, याची काळजी बाळासाहेबांनी घेतली आहे. तो बॉलिंग मशिनच्या साह्याने सराव करत आहे. त्यासाठी शेतामध्येच लहान पिच बनवण्यात आले आहे. VIDEO: 'बाबा मला सायकल शिकवा ना' म्हणणाऱ्या मुलीचा हट्ट अखेर रोहित पवारांनी केला पूर्ण ग्रामीण भागातील मुलांना फायदा बाळासाहेबांनी त्यांचा मुलगा अभियश याच्या सोयीसाठी हे मैदान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानाचा वापर अन्य स्पर्धांसाठी देखील भविष्यात केला जाणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना उत्तम सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
First published:

Tags: Cricket, Maharashtra, Pandharpur

पुढील बातम्या