कोल्हापुरात मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अधिकारी ACB च्या जाळ्यात

कोल्हापुरात मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अधिकारी ACB च्या जाळ्यात

मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणारा एका अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगेहाथ अटक केली.

  • Share this:

कोल्हापूर, 6 ऑगस्ट- मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणारा एका अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगेहाथ अटक केली. जयवंत पाटील असे आरोपीचं नाव आहे. सीपीआर हॉस्पिटलचा तो भांडारपाल असून त्याला एक लाख रुपयांची लाच घेतानी कोल्हापूरच्या ACB पथकाने रंगेहाथ अटक केली.

कोल्हापुरात सध्या भयानक पूरस्थिती आहेत. सीपीआर हॉस्पिटलचा भांडारपाल जयवंत पाटील याने मृतदेहांवर अंथरण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या टेंडरसाठी चार लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी एक लाख रुपये घेताना या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत सीपीआर हॉस्पिटलला कापड पुरवलं जातं. या कापडाचे टेंडर पास करण्यासाठी जयवंत पाटील याने लाच मागितली होती.

आंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला झाली होती अटक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तहसिलदार सुषमा पैकेकरी व त्यांचा लिपिक दिनकर लाडके यांनी कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारा व्यावसायिक यांच्याकडून 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. घोडेगाव येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वाहातूक करणारी ट्रक आणून ठेवली होती. तहसिलदार सुषमा पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रूपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार व तहसिलदार सुषमा पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रूपये दंड व 1 लाख रूपये लाच देण्याचे ठरले. यावरून तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तहसिल कार्यालयात 50 हजार रूपयांची रोख लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण

Published by: Sandip Parolekar
First published: August 6, 2019, 4:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading