मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: नाना पटोले बंजारा नृत्यावर थिरकले अन् कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले

VIDEO: नाना पटोले बंजारा नृत्यावर थिरकले अन् कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमात कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमात कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमात कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं.

जालना, 18 ऑगस्ट : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, त्याच दरम्यान त्यांच्याच सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे (Covid norms) उल्लंघन केल्याचं दिसून आलं. जालन्यात बोल मैं हलगी बजाऊ क्या म्हणत बंजारा नृत्यावर थिरकत कोरोना नियम पायदळी तुडविताना पाहायला मिळाले. नाना पटोले मंगळवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पटोले यांचा जालना शहरात आणि वाटूर येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पटोले यांनी मंठा येथे 'काँग्रेस आपल्या दारी' या कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पटोले यांचं बंजारा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. VIDEO: नागपुरात ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा; लुटीचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा धक्कादायक CCTV या स्वागत सोहळ्यात बंजारा समाजबांधवांनी पारंपारीक नृत्य सादर करत आणि पारंपरिक हलगी वाजवत पटोले यांचं स्वागत केलं. या स्वागत सोहळ्यात पटोले यांनी स्वतः हलगी वाजवत पारंपरिक वेशभूषेतील महिलांसोबत बंजारा नृत्य सादर करत उपस्थितांचा आनंद वाढवला. स्वागत सोहळ्यात सहभागी झालेल्या पटोले यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यासोबत बंजारा नृत्य केलं. मात्र, यावेळी सर्वांना कोरोना नियमांचा पूर्णपणे विसर पडला होता. नाना पटोलेसह बहुतांश उपस्थितांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता आणि सोशल डिस्टनसिंगचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Nana Patole

पुढील बातम्या