मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जालन्यात पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटलची तोडफोड, कर्मचारी जखमी

जालन्यात पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटलची तोडफोड, कर्मचारी जखमी

कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांना अशी वागणूक देणे योग्य नसल्याचं...

जालना, 31 मे : जालन्यामध्ये (Jalana) काही दिवसांपूर्वी एका कोविड हॉस्पिटलमध्ये (Covid Hospital) नातेवाईकांनी धुडगूस घातल्याचा प्रकरण ताजा असतानाच आज पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी धुडगूस घालून राडा केल्याचा प्रकार उघडकीस आला. शहरातील नूतन वसाहत परिसरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेत एक ब्रदर जखमी झाला असून याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,  कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आपल्या नातवाईकाच्या बिलावरून रितेश चौधरी याचा हॉस्पिटलमधील मेडिकल चालकासोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर बाचाबाचीमध्ये झाले. रोज प्या ताक, लस्सी इम्युनिटी, वजन याशिवाय अनेक आहेत Health Benefits त्यानंतर रितेश चौधरी याने आपल्या अन्य 2 साथीदारांना घेऊन आला आणि हॉस्पिटलवर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली. मेडिकलची तोडफोड झाल्याने मोठा नुकसान झालं. या घटनेत हॉस्पिटलमधील एक ब्रदर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी फौजफाट्यासह जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी रितेश चौधरी याला ताब्यात घेतलं असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांना अशी वागणूक देणे योग्य नसल्याचं पोलीस निरीक्षक महाजन यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या