Home /News /maharashtra /

कोरोनाबाधित महिलेनं दिला जुळ्यांना जन्म, लग्नानंतर 10 वर्षांनी घरात हलला पाळणा

कोरोनाबाधित महिलेनं दिला जुळ्यांना जन्म, लग्नानंतर 10 वर्षांनी घरात हलला पाळणा

महिला कोरोना पॉझिटिव्ह, मूल होत नाही, म्हणून ती IBF पद्धतीने गरोदर राहिलेली.

अहमदनगर, 28 मे: अहमदनगर  येथील शासकीय रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी एक मुलगा आणि मुलगी आहे. बाळ, बाळंतीन असे तिघेही सुखरूप आहेत. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, करोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि दोन्ही शिशुंना कोणातीही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हेही वाचा.. एका महिलेमुळे आख्ख गाव झालं सील, डॉक्टरसह 29 जण होम क्वारंटाईन परिवारात नवीन पाहुणा येणार यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहात असते आणि तेही तब्बल लग्न नंतर 10 वर्षांनी असेल तर आनंद काही वेगळाच असतो. मात्र, ही महिला उल्हासनगरहून निबळक येथे आली होती. ती 9 महिन्याची गरोदर होती, तिला त्रास होऊ लागल्याने 24  तारखेला तिला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी  तिची  कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्याने महिलेसह कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना या महिलेला लागण झाल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते. डॉक्टरांसमोरही प्रश्न निर्माण झाला. महिला कोरोना पॉझिटिव्ह, मूल होत नाही, म्हणून ती IBF पद्धतीने गरोदर राहिलेली. ते ही लग्नानंतर 10 वर्षांनी, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. जिल्हा शल्य चिकित्सक मुरणबीकर यांनी त्यांच्या टीमसह नगर अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ.जोत्सना डोले यांची मदत घेतली. या महिलेची 28 मे रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने एक मुलगा आणि मुलीला अशा जुळ्यांना जन्म दिला आहे. हेही वाचा.. वहिनीच्या बहिणीवर जडला जीव, लग्नाला नकार दिल्यानं केली हत्या शासकीय रुग्णालयात कोविड-19 रूग्णालयात विशेष आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या महिलेवर आणि दोन्ही बाळांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. डॉ. मुरणबीकर आणि त्यांच्या टीमने ही प्रसूती यशस्वी केली आहे. आई आणि दोन्ही मुलांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या