मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus मृत्यूंचं गौडबंगाल; फडणवीसांच्या आरोपांनंतर 24 तासांत समोर आली भयावह मृत्यूसंख्या

Coronavirus मृत्यूंचं गौडबंगाल; फडणवीसांच्या आरोपांनंतर 24 तासांत समोर आली भयावह मृत्यूसंख्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 3 महिने हे आकडे लपवणाऱ्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 3 महिने हे आकडे लपवणाऱ्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 3 महिने हे आकडे लपवणाऱ्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 16 जून : Coronavirus मुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर 24 तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत. या फेरपडताळणीत कोविड मृत्यूंची संख्या 1328 ने वाढल्याचं दिसतं. 862 प्रकरणं मुंबई महानगर क्षेत्रातली आणि अन्य जिल्ह्यातले 466 प्रकरणं कोव्हिड मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले आहेत. याची सविस्तर यादी राज्य सरकारने आता जाहीर केली आहे. 15 जूनपर्यंत राज्यात कोरोनाबळींची संख्या 4128 होती. त्यात आजच्या या फेरपडताळणीनंतर जवळपास 30 टक्क्यांनी वाढली आहे. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे." वाचा - धारावी नव्हे तर मुंबईतील 'हा' भाग आता कोरोनाचा हॉटस्पॉट; आठवडाभरातच रुग्ण वाढले काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊनसुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. ICMR आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला होता. ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केलं. अन्य बातम्या ‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यांचीही होणार पोलीस चौकशी
First published:

Tags: Coronavirus, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या