जुलै-ऑगस्टमध्ये होणार कोरोना साथीचा विस्फोट? राज्यात युद्धपातळीवर सज्जतेच्या सूचना

जुलै-ऑगस्टमध्ये होणार कोरोना साथीचा विस्फोट? राज्यात युद्धपातळीवर सज्जतेच्या सूचना

महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 26 जून : जुलै- ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा (Covid-19) विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh tope)यांनी दिली. Coronavirus ची साथ अनलॉकनंतर सातत्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यात आता Unlock 2 अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या सूचना येणार आहेत. निर्बंध आणखी सैल होणार आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून WHO स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांनी कोरोनाच्या मोठ्या लाटेची शक्यता पुढच्या वर्षात वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात या दृष्टीने अधिकचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि ICU, व्हेंटिलेटर यांची सोय करण्यात येत आहे, असं टोपे म्हणाले.

पुण्यात टोपे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar), उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी अशी बैठक घेतली. कोरोनासंदर्भातल्या उपाय योजनांवर यामध्ये चर्चा झाली. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. आता रुग्णसंख्येची नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येची अधिक काळजी करायला हवी, असं टोपे म्हणाले. कोरोनामुळे मृत्यू होऊ नये, वेळीच उपचार मिळावेत यासाठी सज्ज राहायचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात यापुढे लॉकडाऊन नाहीच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुण्यात मोठी घोषणा

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू होणार आहेत. त्यामुळे अधिक संख्येने लोक घराबाहेर पडतील. त्यातच पावसाळी वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढली आहे.

या राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राजधानीत 15 दिवसांचा पूर्ण Lockdown!

'पुणे आणि सोलापुरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत आहोत', असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी 1लाख अँटी जेन चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा यावेळी टोपेंनी केली आहे.

संकलन - अरुंधती

First published: June 26, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading