बहीण-भावाच्या नात्याला काळिमा.. अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा.. अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच 'रक्षाबंधन'. या सणाच्या तोंडावर बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

जळगाव, 14 ऑगस्ट- भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच 'रक्षाबंधन'. या सणाच्या तोंडावर बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चुलत भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळ घडली आहे. या प्रकरणी आरोपी देवेंद्र मोरे (वय-22, रा. वैजापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पाच-सहा वर्षाच्या आहेत पीडित मुली...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही पीडित मुली पाच-सहा वर्षाच्या आहेत. आरोपीने दोन्ही बहिणींना वैजापूर-मेलाणे रस्त्यावरील शेतात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. त्यातील एका चिमुरडीने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढल्याने ती बचावली. तिने घरी येऊन आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. तसेच आपल्या बहिणीवर शेतात आरोपी अत्याचार करत असल्याची माहिती दिली.

पीडितेने दिलेल्या माहितीवरून नातेवाईकांनी थेट घटनास्थळ गाठले. पीडितेला नराधमाच्या तावडीतून सोडवले. अत्याचार झालेल्या मुलीला तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपीला पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे.

मावस बहीण-भावाची आत्महत्या, FBवर लिहिली भावुक पोस्ट

बहीण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधून त्याच्याकडून वचन घेत असते. मात्र, याच नात्याला आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात गालबोट लागले आहे. मावस बहीण-भावाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय अशोक जाधव (वय 24) आणि ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे. अक्षयने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्येसाठी स्वत:च्या नातेवाईकांना जबाबदार धरले आहे.

अक्षय हा मुंबईचा तर ऋतुजा ही आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे राहणारी होती. दोघेही नात्याने मावस भाऊ-बहीण होते. मात्र, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. अक्षय हा मंबईवरुन रात्रीच्या सुमारास आला होता. त्यानंतर खडकी येथील शंकराच्या मंदिराजवळ असलेल्या विहिरीत अक्षय आणि ऋतुजाने आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगत होते. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस आता दोघांच्याही नातेवाईकांची चौकशी करत असून लवकरच सत्य बाहेर येईल असंही पोलिसांनी सांगितंय.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 14, 2019, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading