दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, भावाने केला...

दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, भावाने केला...

विद्येचं माहेर घर अर्थात सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. चुलत भावानेच दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली.

  • Share this:

पुणे, 6 मे- विद्येचं माहेर घर अर्थात सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. चुलत भावानेच दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली.

पीडित मुली राहात होत्या चुलत्याच्या घरी..

दोन्ही पीडित मुली चुलत्यांच्या घरी राहात होत्या. पीडित मुलींनी घडलेल्या सर्व प्रकारची माहिती चुलतीला सांगितली होती, मात्र तिने याकडे दुर्लक्ष केले. अखेर मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन नराधम भावाविरोधात तक्रार दाखल केली.

चुलत्यानेही मुलींशी केले होते अश्लील चाळे

यापूर्वी चुलत्यानेही या मुलींशी अश्लील चाळे केले होते. याबाबतही मुलींनी चुलतीला सांगितले होते. मात्र, तिने मुलींनाच दमदाटी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी चुलता, चुलती आणि चुलत भावावर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी पितापुत्र दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

First published: May 6, 2019, 3:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading