• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • बलात्कार पीडित चिमुकलीचं मोठं धाडस; कोर्टात वाचला अत्याचाराचा पाढा, नराधमाला जन्मठेप

बलात्कार पीडित चिमुकलीचं मोठं धाडस; कोर्टात वाचला अत्याचाराचा पाढा, नराधमाला जन्मठेप

अगदी कोवळ्या वयात बलात्कारासारखा मानसिक आणि शारीरिक आघात झाल्यानंतरही एका बलात्कार पीडित 7 वर्षीय चिमुकलीने न्यायालयात तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे.

 • Share this:
  जळगाव, 23 सप्टेंबर: अगदी कोवळ्या वयात बलात्कारासारखा मानसिक आणि शारीरिक आघात झाल्यानंतरही एका बलात्कार पीडित 7 वर्षीय चिमुकलीने (Minor girl rape case) न्यायालयात तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. तिने कोर्टात घडाघडा आपबिती सांगितल्यानंतर न्यायालयाने नराधम आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली आहे. अतिरिक्त न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी या महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नेमकं काय घडलं होतं? संबंधित घटना जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील धरणगाव येथील आहे. 24 जून 2016 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घराच्या जवळ शेतात शौचासाठी गेली होती. दरम्यान नराधम आरोपी जावेद सलीम शेख याची तिच्यावर नजर पडली. यानंतर आरोपीने तिच्या मागे जाऊन तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला पोक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. हेही वाचा-पुणे: सायबर कॅफेत जाताना तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह गेली पाच वर्षे न्यायालयीन लढा दिल्यानंतर, अतिरिक्त न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने साक्षी आणि पुराव्याअंती नराधमाला 5 वर्षे सश्रम कारावास आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्या अंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास तसेच एम-5 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हेही वाचा-'मानसिक आजार दूर करण्यासाठी SEX करावं लागेल', YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. तसेच महिला सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी 7 वर्षीय पीडित मुलीला विश्वासात घेऊन न्यायालयात बोलतं केलं. महिला वकीलाने धीर दिल्याने पीडितेनं तिच्यावर घडलेल्या अत्याचाराचा प्रसंग घडाघडा बोलून दाखवला. यानंतर न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: