मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलिसांना शरण या नाहीतर निर्णय द्यावा लागेल, कोर्टाने डीएसकेंच्या मुलाला झापलं

पोलिसांना शरण या नाहीतर निर्णय द्यावा लागेल, कोर्टाने डीएसकेंच्या मुलाला झापलं

    पुणे,  05 जून : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. इतकंच नाही तर शुक्रवारपर्यंत पोलिसांना शरण येण्यासंदर्भात शिरीष यांनी निर्णय घ्यावा अन्यथा अटकपूर्व जामीन याचिका फेटाळत आम्हाला त्या संदर्भात निर्णय द्यावा लागेल अशा सज्जड शब्दात कानउघाडणीही केली आहे.

    डीएसके ब्रँडपासून आपण वेगळे आहोत असं भासवत तुम्हाला कायद्यापासून पळत काढता येणार नाही असंही हायकोर्टानं सुनावलं आहे. त्यामुळे या अटकपूर्व जामीन अर्जावर तुमचा युक्तीवाद ऐकण्यास आम्हाला काहीही स्वारस्य नाही असंही कोर्टाने शिरीष यांच्या वकिलांना सुनावलं.

    डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती या सध्या गुंतवणुकदारांना फसवल्या प्रकरणी पुण्यातील कारागृहात आहेत. तर शिरीष यांची पत्नी तन्वी यांनीदेखील पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

    First published:
    top videos

      Tags: DSK