राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचा 1 आमदार अडचणीत, कोर्टाचा दणका

राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचा 1 आमदार अडचणीत, कोर्टाचा दणका

राष्ट्रवादीचे विद्यमान 2 आमदार, शिवसेनेचा 1 आमदार आणि काँग्रेसचे 2 माजी मंत्री अडचणीत आले आहेत.

  • Share this:

नाशिक, 7 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान 2 आमदार, शिवसेनेचा 1 आमदार आणि काँग्रेसचे 2 माजी मंत्री अडचणीत आले आहेत. या नेत्यांना 12 कोटींच्या साखर घोटाळा प्रकरणी कोर्टाने दणका दिला आहे.

निफाड साखर कारखान्यात 2007 ला घोटाळा झाला होता. याप्रकरणी तत्कालीन 24 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या 24 संचालकांमध्ये राष्ट्रवादी विद्यमान आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, काँग्रेसच्या माजी मंत्री शोभा बच्छाव आणि तुकाराम दिघोळे यांचा समावेश आहे.

माणिकराव कोकाटे यांनी भाजपमधून बंडखोरी करत लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी कोकाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. मात्र आता कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

एकीकडे, सत्तेच्या स्पर्धेत एक-एक आमदार महत्त्वपूर्ण ठरत असताना कोर्टाने विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. 'जनतेनं भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने त्यांनी सत्ता स्थापन करावी,' अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली असली तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग काँग्रेस नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे आजचा दिवस सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

First published: November 7, 2019, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading