क्वारंटाइन ठेवल्या प्रकरणी नागपूर पालिकेला कोर्टाची नोटीस

क्वारंटाइन ठेवल्या प्रकरणी नागपूर पालिकेला कोर्टाची नोटीस

या नोटीसमध्ये दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

  • Share this:

नागपूर, 04 मे : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परंतु, नागपूरमध्ये नागरिकांना क्वारंटाइन केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

नागपुरातील  सतरंजीपुरा या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील नागरिकांना क्वारंटाइन केल्या प्रकरणी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाकडून नियमबाह्य पद्धतीने क्वारंटाइन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

हेही वाचा - भारतातल्या कोरोना रुग्णांना दिली जाणार अमेरिकेतली कथित संजीवनी

या प्रकरणावर रविवारी नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. रविवारी असतानाही न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यावर सुनावणी झाली.  कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून सतरंजीपुऱ्यात राहणाऱ्या 1408 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सर्वांना सक्तीने का  ठेवण्यात आले, अशी  विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर पालिकेला केली आहे.

नागपूर खंडपीठाची केंद्र सरकार, राज्य सरकार, नागपूर महापालिका आणि आयसीएममारला नोटीसही बजावली आहे. या नोटीसमध्ये दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

'नागपुरात कोणत्याही अटी शिथील नाही'

दरम्यान, आजपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. राज्यातील ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या आहे.  परंतु, नागपूरमध्ये कोणत्याही अटी शिथील करण्यात आल्या नाही, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.  'लॉकडाउन 3.O मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्या कारणाने इथं कुठलंही शिथिलता राहणार नाही', असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं.

दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील. सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना 30 टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील.  वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - 

विधान परिषदेसाठी सेनेची मोर्चेबांधणी, उद्धव ठाकरेंसह 'हे' नाव निश्चित

लॉकडाऊन ३ मध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवू नये, असंही मुंढे यांनी स्पष्ट केलं.

तसंच, लॉकडाउन-2 प्रमाणेच लॉकडाउन -3 मध्ये नियम लागू राहतील. हे सर्व नियम पाळत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन पाळावे, असे आवाहनही पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 4, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या